नवाब मलिकांना न्यायालयाचा तर मुलगा फराजला ईडीचा दणका;
सुटकेचे अंतरिम आदेश देण्याची मलिक यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
ईडीनेच या समन्ससंदर्भात दिली सविस्तर माहिती
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक व्यवहाराच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना करण्यात आलेली अटक ही आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतील तरतुदींना अनुसरूनच होती, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच सुटकेचे अंतरिम आदेश देण्याची मलिक यांची मागणीही फेटाळून लावली. असे असले तरी अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. असं असतानाच दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने नवाब मलिक यांच्या मुलाला तिसऱ्यांदा समन्स पाठवण्याची तयारी सुरु केलीय. दोनदा समन्स देऊनही नवाब मलिक यांचा मुलगा ईडीसमोर हजर झालेला नाही.
ईडीने नक्की काय म्हटलंय?
“सक्तवसुली संचालनालयाने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकला १५ मार्च रोजी समन्स पाठवले आहेत. मात्र तो ईडीसमोर उपस्थित राहिलेला नाही,” अशी माहिती ईडीनेच दिलीय. “फराजला पाठवलेलं हे दुसरं समन होतं. लवकरच त्याला तिसऱ्यांदा समन्स पाठवल जाईल”, असंही ईडीने स्पष्ट केलंय. फराजला समन्स का पाठवण्यात आलेत यासंदर्भात माहिती देताना, “ईडीला त्याला कुर्ल्यातील गोवावाला इमारतीसंदर्भातील व्यवहारासंदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत,” असं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलंय.