सीबीआयला राज्यात नो-एन्ट्री; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सीबीआयला कोणत्याही प्रकरणी महाराष्ट्रात तपास करण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागणार आहे. याच निर्णयावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलतांना राज्य सरकारवर सडकून टीका केली.

किरीट सोमय्या म्हणाले,’सोशल मीडियावर कुणीही विरोधात बोललं तर हे सरकार त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण करतं. पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकलं जातंय.’

ते पुढे म्हणाले,शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी सीबीआयची सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेतला आहे”, असा आरोप सोमय्या यांनी केला आह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here