अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयूला लागलेल्या भीषण आग प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याप्रकरणाची चौकशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितलं.आयुक्त पांडे म्हणाले, “निष्काळजीपणामुळं मृत्यूप्रकरणी अज्ञातांवरोधात भादंवि कलम ३०४ अ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस निरिक्षक किंवा पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाच्या चौकशी केली जाईल.”
अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राज्य सरकारकडून या अग्निकांडप्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही अतिशय दुर्देवी घटना असून सरकारनं वारंवार रुग्णालयांना फायर ऑडिट करण्याच्या सूचना देऊनही अशा घटना घडतात हे दुर्देवी आहे.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार घटनास्थळी दाखलदरम्यान, अहमदनगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत आयसीयूतील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. हे सर्वजण कोविडचे उपचार घेत असलेले रुग्ण होते. तर अनेक जण यात जखमी झाले आहेत. राज्य शासनानं यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.