नगरच्या ‘सिव्हिल’मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत अकरा रुग्णांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याविरुध्द निलंबिनाची कारवाई करणं सर्वांनाच अभिप्रेत होतं. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी सपना पठारे, स्टाफ नर्स आस्मा शेख, स्टाफ नर्स चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सिव्हिल’मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेला या इमारतीचं ‘फायर आॅडिट’ नसणं हा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘फायर आॅडिट’ संदर्भात ‘सिव्हिल’ प्रशासनाला केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सिव्हिल सर्जनची असते.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.
1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित
2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त
6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त