* केंद्र सरकारने देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात एसओपी जारी करण्यात आली असून 15 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे एसओपी जारी केली आहे. त्यानुसार सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती लावता येणार आहे. सिनेमागृह 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. यापूर्वी सिनेमा हॉल उघडण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, मंत्रालयाला वाटते की, सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल सुरु करावे आणि नियमांची काटेकोरपणे करण्यात यावे. मार्चमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन जूनपर्यंत सुरु होता. आता अनलॉक-5 येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे
- Cyber crime
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- खेळ
- ठाणे
- देश-विदेश
- नवी मुंबई
- नागपूर
- नाशिक
- पाककृती
- पुणे
- बीड
- मनोरंजन
- मुंबई
- रायगड
- लाईफस्टाईल
- व्यापार
- व्हिडिओ