सिटी स्कॅनचे दर निश्चित! राज्य सरकारचा मोठा निर्णय!

    886

    सिटी स्कॅनचे दर निश्चित! राज्य सरकारचा मोठा निर्णय!

    मुंबई :Bकोविड, नॉन कोविड रुग्णांच्या अचूक निदानासाठी सिटिस्कॅन आवश्यक असते. राज्य सरकारने खासगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटिस्कॅनचे दर निश्चित केले आहेत.

    यासाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सिटीस्कॅनसाठी आता २ ते ३ हजार रुपयेच रुग्णांकडून आकारता येतील. यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.

    सरकारने याची दखल घेऊन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीचा अहवाल सरकारने मान्य केला.

    १६ स्लाईडपेक्षा कमी सिटिस्कॅनसाठी दोन हजार, १६ ते ६४ स्लाईडच्या सिटिस्कॅनसाठी २ हजार ५०० रुपये तर ६४ स्लाईडपेक्षा जास्त असणार्‍या सिटिस्कॅनसाठी ३ हजार रुपये आता आकारता येतील.

    या रकमेत सिटिस्कॅन तपासणी, अहवाल, डिसइन्फेकटनट, पीपीई किट, सिटी फिल्म, सॅनिटायझेशन, जीएसटी यांचा समावेश असेल. हे दर नियमित व तातडीच्या तपासणीसाठी समान असून आदेश निघाल्यापासून लागू होतील.

    तपासणी अहवालात कोणत्या सिटिस्कॅनद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा आहे किंवा रुग्णालय, कार्पोरेट संस्थेने अशा तपासणी केंद्राशी संबंधित करार केला असल्यास हे दर लागू राहणार नाहीत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here