साहिल सय्यद गुणवंत विद्यार्थी सन्मान पुरस्काराने सन्मानित !
अहमदनगर प्रतिनिधी : दिनांक 7 सप्टेंबर रोजी माऊली संकुल अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष सुमित वर्मा लिखित युवा अंडरग्राउंड या पुस्तकाच्या प्रकाशना निमित्त गुणवंत विद्यार्थी सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. युथ आयकॉन फाऊंडेशनच्या अंतर्गत सुरू असलेल्या युथ कराटे फेडरेशन च्या माध्यमातून कराटे या खेळामध्ये साहिल सय्यद यांनी अहमदनगरचे तसेच देशाचे नाव उंचावले आहे ! साहिल सय्यद यांनी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला अनेक पदके मिळवून दिले आहे तसेच त्यांनी एक विश्वविक्रम देखील केला आहे. या सर्व कार्याची दखल घेत ! युवा अंडरग्राउंड या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान देत साहिल सय्यद यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रूपाली ताई ठोंबरे पाटील आणि विद्यमान नगरसेवक वसंत तात्या मोरे , काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण काळे , या कार्यक्रमाला उपस्थित होते साहिल सय्यद यास नगरसेवक वसंत तात्या मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष कष्ट घेतले तसेच या कार्यक्रमामध्ये सुमित संतोष वर्मा यांचे युवा अंडरग्राउंड या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले युवकांनी पुढे यायला हवे असे नरेंद्रजी फिरोदिया बोलताना म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवकांनी पुढे येत राष्ट्र निर्माणासाठी पाऊल टाकले पाहिजे असे आवाहन व्हिडिओच्या माध्यमातून केले साहिल सय्यद यास युथ आयकॉन फाउंडेशनच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला यावेळी युथ आयकॉन फाउंडेशन चे युथ 24 न्यूजचे संपादक सबील सय्यद , बिझफ्लाय असोसिएशनचे आदेश गायकवाड , ॲड.शीतल बेंद्रे स्टाट-अप इन्फोटेक चे सीईओ मयुरेश बुचकूल उपस्थित होते !





