सावधान! ‘कपल चॅलेंज’साठी सोशल मीडियावर फोटो टाकताय? मग आधी हे वाचाच

    903

    सावधान! ‘कपल चॅलेंज’साठी सोशल मीडियावर फोटो टाकताय? मग आधी हे वाचाच

    सोशल मीडियावर कोणता ट्रेंड कधी व्हायरल होईल याचा कसलाही नेम नाही. सध्या आपल्या जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेंड अर्थात कपल चॅलेंज हा ट्रेंड जोरात सुरु आहे.

    मात्र या जोरात चाललेल्या ट्रेंडविषयी पुणे पोलिसांनी गंभीर इशारा दिला असून, या चॅलेंजमध्ये टाकलेल्या वैयक्तिक फोटोंच्या गैरवापर केला जाऊ शकतो असा गंभीर इशारा पोलिसांनी दिला आहे.

    काय आहे प्रकरण? :

    ▪️ काही दिवसांपूर्वी सुरू झालेले हे चॅलेंज प्रचंड लोकप्रिय झाले आहे. तर आतापर्यंत 2 दशलक्षाहूनही अधिक लोकांनी कपल चॅलेंज स्वीकारले आहे.

    ▪️ असामाजिक लोक या फोटोंचे मॉर्फ बनवू शकतात आणि ते अश्लील आणि इतर सायबर गुन्ह्यांसाठी वापरू शकतात, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

    ▪️ ‘आपल्या पार्टनरचा फोटो शेअर करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. जर तुम्ही सतर्क राहिला नाहीत तर एक ‘क्यूट’ चॅलेंज तुमच्यासाठी अडचणीचे ठरु शकते’ असे यावेळी पुणे पोलिसांनी ट्विटरवर सांगतले आहे.

    ▪️ कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपल चॅलेंज होईल. ‘या फोटोंचा वापर मॉफिंग, बदला घेणे, पोर्न आणि सायबर क्राइमसाठी केला जाऊ शकतो, असाही इशारा पोलिसांनी दिला आहे

    दरम्यान, हे चॅलेंज कुणी सुरू केले हे स्पष्ट झालेले नसून, ज्यांना हे चॅलेंज आवडलेले नाही ते सोशल मीडियावर राग व्यक्त करत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here