जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी परदेशी कुटुंबायांची घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले. जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी सावखेडा येथे आणण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात आणि ‘जवान मंगलसिंह अमर रहे’च्या जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली. जवान मंगलसिंग परदेशी यांना त्यांचा सहावीतील 12 वर्षीय मुलगा चंदन याने अग्निडाग दिला. पिंपळगाव (हरे.) येथील पोलीसांनी बंदुकीच्या तीन फैरीची सलामी दिली. जवान मंगलसिंह यांच्यामागे आई-वडील, पत्नी किरण, मुलगा चंदन, मुली चंचल व कांचन असा परिवार आहे. जवान मंगलसिंग परदेशी यांना सुमारे 14 वर्षे सेवा केल्यानंतर नाईक पदावर पदोन्नती झाल्याने तीन वर्षं सेवेचे वाढवून मिळाले होते. सेवानिवृत्त होण्यासाठी सहा महिने बाकी होते. जवान मंगलसिंग परदेशी यांच्या पार्थिवाचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, जिल्हा सैनिक कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, मधुकर काटे, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात मोठी कारवाई, 4 अधिकारी निलंबित, दोघांच्या सेवा समाप्त
Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात मोठी कारवाई, 4 अधिकारी निलंबित (ahmednagar hospital fire case government suspended four officials...
उपवासाचा समोसा
उपवासाचा समोसा
साहित्य-उकडलेले बटाटे,उकडलेले रताळे,उकडलेली कच्ची केळी,शेंगदाणे कूट,ओलं खोबरं,मीठ,जिरे, ४-५ हिरव्या मिरच्या,तूप,कढीपत्ता,कोथिंबीर,आले,उपवासाचं भाजणी पीठ,साबुदाणा पीठ,राजगिरा पीठ
Covid19 Ahmednagar अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज
सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत इतकी वाढ
दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजताआतापर्यंत ४२ हजार ८८०...
पहा: वंदे भारत ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात माणूस घसरला, रेल्वे पोलिसांनी त्याला वाचवले
पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्थानकावर रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) कर्मचार्यांची सतर्कता, द्रुत विचार आणि जलद कारवाईमुळे एका...






