सामाजिक न्याय विभागास ८२२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त ! स्वाधार योजनेसह शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार..

544

सामाजिक न्याय विभागास ८२२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त !
स्वाधार योजनेसह शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार..

राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांना कोविड परिस्थितीमुळे निधी उपलब्ध होण्यास दिरंगाई झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात समाज कल्याण आयुक्तालयामार्फत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून स्वाधार योजनेसह इतर महत्त्वाच्या विद्यार्थी हिताच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शासनाने सुमारे ८२२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागास वितरित केला आहे. त्यामुळे सदरचा निधी लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सदर निधीसाठी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविन्द कुमार, विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विशेष प्रयत्न करुन सातत्याने निधी मिळण्याबाबत मागणी लावून धरली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृतींचा विषय लावून धरल्याने त्याची दखल शासनाकडून घेण्यात आली आहे.

शासनाकडून वितरित करण्यात आलेला निधी व योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ३० कोटी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीसाठी २० कोटी

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे ५८५ कोटी

मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी करिता १८७ कोटी ५० लाख

Dhananjay Munde

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here