‘साधता संवाद मिटतील वाद’.या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसातील वाद समझोत्याने मिटवण्यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ,शनिवार दिनांक१२मार्च २०२२ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालय, येथे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. अँक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३२० नुसार तडजोड करण्या योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे ,वीज महावितरणची समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली आहेत.
महानगरपालिका आणि ग्रामपंचायत कर वसुली प्रकरणे या मध्ये ठेवण्यात आली आहेत.लोक अदालत मध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते.
ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालत मध्ये ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा.
तरी सदर राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिव रेवती देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी केले आहे.





