** सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटेलेटरची संख्या वाढवा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता रेमडेसिवीर औषधांचा अधिकचा पुरवठा जिल्ह्यासाठी व्हावा यासाठी शासनाला पत्र द्या, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, सध्या जिलह्यात 3 हजार ऑक्सीजन बेड व 200 व्हेंटेलेटर आहेत. भविष्याचा विचार करुन ऑक्सिजन बेड व व्हेंटेलेटरची संख्या वाढवली पाहिजे. शासनाने लॉकडाऊन किंवा आणखीन कडक निर्बंध जाहीर केले तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी गृह विभागाने मनुष्यबळ तयार ठेवावे. तसेच नागरिकांनी मास्कचा, वेळोवेळी सॅनिटायझरचा, सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहनही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.0000
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
‘हिंदू धर्म हा धर्म नसून…’: ‘नाम बदलण्याचे पॅनल’ स्थापन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका...
परकीय आक्रमकांनी बदललेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांची मूळ नावे शोधण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी केंद्राला 'नामांतर आयोग'...
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांचे निधन
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांचे निधनशिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे (वय 41) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात...
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सहावी जागा सोडली, भरतपूर आरएलडीसाठी सोडले
आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी आपली सहावी यादी जाहीर केली, ज्यात संगरिया येथील प्रदेश काँग्रेस कमिटी...
जन अदालत तर्फे संविधान दिन साजरा
पुणे:(प्रतिनिधी: ॲड. शितल बेद्रे.)
जन अदालत तर्फे आज पुणे जिल्हा न्यायालयात घटनेची उद्देशिकेच्या ( preamble)...