तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कोठला परिसरात तब्बल साडेचार लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या पथकाने कडून तिघांना अटक करण्यात आल्याचे कळते.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे कोठला परिसरातल्या अवैध धंदेचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.