नगर (दि.१५) प्रतिनिधी-चोऱ्या, घरफोड्या, खुनाचा प्रयत्न व खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या व पेट्रोल पंपावर दरोडे घालणारी चार सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडली आहे. या गुन्हेगारांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्हेगारांची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. या घटनेत ४ आरोपींना अटक केली आहे.त्याच्या कब्जातुन १ लाख ८० हजार- रु. किं. च्या तीन मोटार सायकल हस्तगत केले आहे.आरोपी मध्ये कृष्णा विलास भोसले, (वय २२ वर्षे, रा. हातवळण खालचे, ता. आष्टी, बीड), सुरेश पुंजाराम काळे, (वय- ३८ वर्षे, रा. सोनवीर, ता. शेवगाव, जि.अ.नगर), रावसाहेब विलास भोसले, (वय- ४० वर्षे, रा. हातवळण खालचे, ता.आष्टी,जि.बीड), अजिनाथ विलास भोसले, (वय- २५ वर्षे, रा. हातवळण खालचे, ता.आष्टी, जि.बीड) यांचा समावेश आहे.याबाबतची माहिती अशी की, दिनांक १ ऑगस्ट रोजी पहाटे 3 च्या सुमारास फिर्यादी अक्षय कुंडलीक गोल्हार, (वय,३०) रा. कोहीनूर मंगल कार्यालयासमोर, सावेडी, नगर) यांचे मालकीचे नगर-सोलापूर रोडवरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात ७ ते ८ आरोपींनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करुन व पिस्टलचा धाक दाखवून मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २,५५,८०० -रुपये रकमेचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता. या घटनेबाबत नगर तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.हा गुन्हा करणारे आरोपी हे त्यांचे गावी हातवळण, ता. आष्टी येथे आलेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ हातवळण येथे जावून सापळा लावून व पाठलाग करुन आरोपी कृष्णा भोसलेला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पेट्रोल पंप दरोडे त्यांने व इतर तिन साथीदारानी मिळून केले असल्याची माहिती दिल्याने या आरोपीतांचा शोध घेतला. व ताब्यात घेतलेल्या वरील नमुद चार आरोपी कडून सदरचे गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या १,८०,०००/-रु. किं. च्या बिना नंबरच्या तीन होंडा शाईन मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या असून आरोपींना मुद्देमालासह नगर तालूका पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही नगर तालूका पो.स्टे. करीत आहेत. या कारवाई दरम्याण आरोपी सुरेश पुंजाराम काळे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे विरुध्द यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता सदर आरोपी शेवगाव पो.स्टे. गुरनं. ५५/२०२०, भादविक ३०२, ४५२, ३७ या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे निष्पन्न झालेले आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, सुनिल चव्हाण, बबन मखरे, संदीप पवार, दत्तात्रय हिगडे, मनोहर गोसावी, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, रविन्द्र घुंगासे, प्रकाश वाघ, रोहीत येमूल, सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, विजय धनेघर, चालक उमाकांत गावडे, बबन बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
Congress : काँग्रेस जिल्हा डॉक्टर सेलच्या निवडी जाहीर
संगमनेर: काँग्रेस (Congress) पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. या पक्षाने देशाच्या हितकारक अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहे. त्यागाची...
महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर बंदी येणार, 105 आमदारांच्या सह्यांचे पत्र; मुख्यमंत्र्यांची संमती, लवकरच होणार निर्णय
गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणपतीच्या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्यात येणार आहे....
Karnataka Hijab Row : कर्नाटकात हिजाब वाद पुन्हा चिघळला, महाविद्यालयाकडून 23 विद्यार्थिनी निलंबित
Karnataka Hijab Row : कर्नाटकातील हिजाब घालण्याचा मुद्दा पुन्हा चिघळला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही मुस्लिम मुली तो मानायला तयार नाहीत....