साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..! शिर्डी साई दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर

449
  • महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संकटाचे ढग गडद होत आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध जारी करण्यात2 आले असून या पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी असलेल्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानच्यावतीने घेण्यात आला आहे.
  • *काय आहे नवीन नियम..*
  • नव्या नियमानुसार आता साईभक्तांना सकाळी 6 ते रात्री 9 याच दरम्यान साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.
  • जमावबंदीचे आदेश असल्यामुळे रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मंदीर दर्शनासाठी बंद असेल.
  • पहाटेच्या काकड आरतीला देखील भक्तांना प्रवेश देण्यात येणार नाही . मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काकड आरती होणार आहे.
  • दरम्यान, मंदिर परिसरात भक्तांनी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन मंदिर आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here