सहकार नगर – पद्मावती प्रभाग क्रमांक 35 मध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

807

पुणे – सहकार नगर – पद्मावती प्रभाग क्रमांक 35 मध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फुटपाथवरील अतिक्रमण समस्या, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट , वाहतूक कोंडी असे अनेक अडचणीचे प्रश्न प्रभागात आ वासून आहेत.


अशा अनेक प्रश्नांना सहकार नगर-पद्मावती भगतील नागरिकांना सामोरे जावे लागते .या सर्व प्रश्नांसाठी प्रभाग क्रमांक 35 मधील चार ही प्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे का ? असा सवाल विजय हिंगे, पर्वती ब्लॉक उपाध्यक्ष काँग्रेस आय
सचिव भिम शक्ति संघटना पुणे शहर यांनी उपस्थित केला आहे.


या सर्व अडचणी बाबत लवकरात लवकर सहकार नगर पद्मावती क्षेत्रीय अधिकारी यांनी लक्ष घालून
नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रतिनीधी : शलाका मुंगी

पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here