*सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा मान औरंगाबादच्या ग्रामीण जिल्हा पोलीस दलाला*
महाराष्ट्र पोलीस महासंचलनालय यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा मान औरंगाबादच्या ग्रामीण जिल्हा पोलीस दलाला मिळाला आहे. जानेवारी-२०२० ते डिसेंबर-२०२० या कालावधीतील कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यांकन करून हा मान औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस दलाला देण्यात आला आहे.या काळात ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वात औरंगाबाद ग्रामीण युनिटचे काम चालले. नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल मोक्षदा पाटील मॅडम आणि संपूर्ण ग्रामीण पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. *पुरस्कार विजेते* ▪️ *अ गट* ▪️ *बेस्ट युनिट* – औरंगाबाद ग्रामीण, रायगड पोलीसदोष सिद्धी सत्र न्यायालयातील खटले – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयतंत्रज्ञानाचा वापर – गडचिरोली, पोलीस अधीक्षकपोलीस कल्याण उपक्रम – वाशिम, पोलीस अधीक्षक ▪️ *ब गट* बेस्ट युनिट – पुणे शहर आणि नागपूर पोलीस आयुक्तालयदोष सिद्धी सत्र न्यायालयातील खटले – लोहमार्ग पोलीस आयुक्तालय, मुंबईतंत्रज्ञानाचा वापर – कोल्हापूर, पोलीस अधीक्षक, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयकम्युनिट पोलिसिंगचा वापर – सातारा व बीड पोलीस अधीक्षक▪️क गटातील पुरस्कारांच्या शिफारसी समितीकडून अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत़ त्यांची निवड नंतर जाहीर करण्यात येणार आहे़.





