कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून… सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड 19 कोविड अनुदानासाठी मदत कक्ष; कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून…50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान लवकरच देण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड 19 मुळे मृत पावलेल्या व्यक्तिच्या वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान लवकरच देण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना काही अडचण असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत जिल्हा आणि महापालिका स्तरावर मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास आपल्या मोबाईलवरून स्वत:चा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र व रुग्णालयाचा तपशील या कागदपत्रांच्या आधारे लॉगइन करता येणार आहे. अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.यांना कागदपत्रांची गरज नाही…केंद्र शासनाकडे ज्यांचा कोविड-19 या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तिंच्या नातेवाईकांचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येणार आहे. इतर प्रकरणी कोविड-19 मुळे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील माहितीची शहानिशा करून मंजूर करण्यात येणार आहेत. अर्जदाराकडे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याची कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत.ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक…– अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक.– अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील.– मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक– मृत व्यक्तीचे वैद्कीय प्रमाणपत्र (Medical Certificate of cause of Death)– मृताचा RT-PCR/Molecular Tests/RAT Positive अहवाल– मृताच्या रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्य चाचण्यांचा अहवाल– अर्जदाराच्या मते हा मृत्यू कोविड-19 मुळे झाल्याचे सिद्ध करत असेल, अशी इतर कोणतीही कागदपत्रे.– मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र– इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचा स्वयं घोषणापत्र
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार का ?
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई प्रकल्प राष्ट्रवादीशी अदानीवरील मतभेदांचे कारणः काँग्रेस नेते
तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अंमलबजावणी संचालनालयाला संबोधित केलेल्या अदानी समूहाविरुद्धच्या तक्रारीवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर,...
सासऱ्याने केला सुनेचा खून अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना अंबाजोगाई
सासऱ्याने केला सुनेचा खून
अंबाजोगाई तालुक्यातील...
कोरोना संसर्गापासून बचावासाठी लस घेणे आवश्यक – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर
वाशिम, दि. २७ (जिमाका) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरु आहे. याकरिता...