सर्वात जास्त सुवर्णपदकांसह महाराष्ट्र संघाला विजेतेपद…

    180

    गोवा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये अहमदनगरच्या खेळाडूंचा ऐतिहासिक विजय !

    अहमदनगर प्रतिनिधी :

    युथ कराटे फेडरेशन च्या वतीने गेली अनेक वर्ष कराटे प्रशिक्षण देण्याचे काम ठिकठिकाणी केले जाते. याच पद्धतीने शहरातील मुकुंदनगर भागामध्ये आणि तालुक्यातील चिचोंडी पाटील गावामध्ये कराटे प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. गोवा मीरामार स्पोर्ट्स स्टेडियम , येथे दिनांक 24 , 25 , 26 फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये मुकुंद नगर तसेच चिचोंडी पाटील येथील विद्याथ्यांनी आणि प्रशिक्षकांनी ऐतेहसिक यश मिळविले आहे.

    यामध्ये खेळाडूंनी विविध पदकांची कमाई केली.

    यावेळी सर्वात जास्त सुवर्णपदकांसह महाराष्ट्र संघ विजेता ठरला आहे. यामध्ये अहमदनगरचे कराटेपटू

    अशाज शेख : २ सुवर्णपदक
    तासिन सय्यद : १ सुवर्णपदक, १ रजत पदक
    यहया सय्यद : २ सुवर्णपदक
    आरफ शेख : २ सुवर्णपदक
    माही शेख : २ सुवर्णपदक
    अब्दुल रेहमान सय्यद : १ सुवर्णपदक , १ रजत पदक
    अब्दुल्लाह सय्यद : १ सुवर्णपदक, १ रजत पदक
    महेक पठाण : २ सुवर्णपदक
    अरफा शेख : २ सुवर्णपदक
    अजीम सय्यद : २ सुवर्णपदक सुजित हजारे :१ सुवर्णपदक, १ रजत पदक
    साहिल सय्यद २ सुवर्णपदक

    यावेळी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व साहिल सय्यद यांनी केले होते.

    अहमदनगर मधील सर्वच खेळाडूंचे भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच राष्ट्रीय कराटे कप देऊन प्रशिक्षक साबिल सय्यद प्रशिक्षक साहिल सय्यद प्रशिक्षक सुजीत हजारे प्रशिक्षक अजीम सय्यद यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक समितीमधील संदीप सांखरे यांनी सर्वच खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. आणि पुढे देखील अशाच पद्धतीने खेळाडू घडावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.. याच प्रमाणे श्री विजय कोळी स्पोर्ट्स क्लब चे सर्वेसर्वा शिहान विजय कोळी यांनी खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here