सर्वसामान्यांना मोठा झटका ! गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

    347

    देशात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पुन्हा एक मोठा धक्का बसलेला आहे. यामध्ये तुम्हाला आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

    सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. कारण घरगुती गॅस कंपन्यांनी दीर्घ कालावधीनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये झाली आहे. आतापर्यंत हे सिलिंडर 1053 रुपयांना मिळत होते. नवीन दर 1 मार्चपासून लागू झाले आहेत.

    यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी तेल कंपन्यांनी दरात वाढ केली होती. त्यावेळीही कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करून ती 1053 रुपयांपर्यंत वाढवली होती.

    कालपर्यंत दर 1769 रुपये होता

    गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र त्यानंतर तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.

    यावेळी कंपन्यांनी 350.50 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीमुळे गॅस सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये झाली आहे. यापूर्वी हा सिलिंडर 1769 रुपयांना मिळत होता. 1 जानेवारी रोजी या सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढली होती.

    यापूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घसरण होताना दिसत होती. 1 मे 2022 रोजी, व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत विक्रमी 2355.50 इतकी होती.

    1 मार्च रोजी घरगुती सिलिंडरचे दर

    दरम्यान, आजपासून दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1053 रुपयांऐवजी 1103 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत हा सिलेंडर 1052.50 रुपयांऐवजी 1102.5 रुपयांना विकला जाईल. कोलकात्यात त्याची किंमत 1079 रुपयांऐवजी 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांऐवजी 1118.5 रुपये असेल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here