सराईत फरार आरोपी तोफखाना पोलीसाकडून जिरेबंद: तोफखाना पोलिसांची कारवाई .

सराईत फरार आरोपी तोफखाना पोलीसाकडून जिरेबंद:
तोफखाना पोलिसांची कारवाई .
अहमदनगर- खंडणीच्या व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना गुंगारा देत सहा महिन्यांपासून फरार असणारा आरोपी पकडण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे. विजय भगवान कु-हाडे (वय 19, रा-गांधीनगर, बोल्हेगांव, अहमदनगर ) असे पकडण्यात आलेल्यांचे नावे आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि जे.सी.गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि नितीन रणदिवे, पोउपनि समाधान सोळंके यांच्यासह पोहेकॉ जपे, पोना वाघचौरे, पोना वसिम पठाण, पोना इनामदार, पोहेकॉ सुनिल शिरसाठ, पोकॉ चेतन मोहीते, पोकॉ बळे, पोकॉ अनिकेत आंधळे, पोकॉ केदार आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेला गु.रजि. नं. 568/2021 भा.दं.वि.क.397,386 वैगेरे प्रमाणे दाखल गुन्हयातील सराईत आरोपी विजय भगवान कु-हाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा पोलीस वेळोवेळी शोध घेत होती. रविवार (दि. 26) पोउपनि समाधान सोळंके यांना गोपनीय माहीती समजले कि, फरार आरोपी हा जिमखाना मैदान, एम.आय.डी.सी.येथे येणार आहे अशी माहीती मिळाली. त्यानुसार माहिती ठिकाणी सापळा लावून आरोपीस मोठ्या शिताफिने पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here