9 डिसेंबरला बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यामुळे या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
तसेच या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरु करा, तसेच बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.