
चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद खंडेराव पवार यांना दोन वर्षासाठी जिल्हा हद्दपारीची नोटीस नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्याकडून बजावण्यात आली आहे. मागील १५ दिवसापूर्वी सरपंच शरद पवार यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी सरपंच पद अपात्रतेची कारवाई केलेली आहे.
आता जिल्हा बंदीची कारवाई झाल्याने अचानक शरद पवार व कार्यकर्ते संतप्त होऊन या दोन्ही कारवाया बोगस असून, त्याच्यामागे राजकीय सत्ताधारी भाजपच्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा हात असल्याची चर्चा आहे. राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे ही जाणिवपूर्वक कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे.
मागील १० वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच व पंचायत समिती, बाजार समिती, यासारख्या निवडणुका लढून, विकास कामांचा डोंगर उभा केला आहे व चिचोंडी पाटील गावात, तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी अनेक आंदोलने करून प्रशासनाला जाग आणून दिली. अनेकांना न्याय मिळवून दिला, करोडो रुपयांच गोरगरिबांना सातबारा वरून चोरी झालेल्या जमिनी परत मिळवून दिल्या, पवार यांनी अनेकांच्या सुखदुःखात दिवस रात्र काम केले. गोरगरिबांचे अनेक कामे केल्याने सत्ताधाऱ्यांच्य डोळ्यात पवार खूपत असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुक वेळी ही शरद पवार यांना गाव बंदी करून १०० पोलिसांचा ताफा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात पवार यांना पकडण्यासाठी आले. आता थेट सरपंच पद अपात्रतेची व दोन वर्षासाठी जिल्हा बंदी हद्दपार कारवाई केल्याने सत्ताधारी पवार यांना लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
शरद पवार यांना पोलिसांनी बीड जिल्हयातील आष्टी, शिरूर कासार, चकलंबा, पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला व संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, व अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. पवार यांनी कुठेही अतिक्रमण केले नसल्याचा दावा केला आहे. सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हताशी धरून आता पवार यांच्यावर हद्दीपारीची नोटीस बजावली असली तरी आमचा न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आम्हाला न्याय मिळेल. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही कार्यवाई केली जात असल्याने नगर तालुका विकास आघाडी व मी स्वस्थ बसणार नाही असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.