सरपंच व्हायचंय? काय आहेत अटी जाणून घ्या!

सरपंच व्हायचंय? काय आहेत अटी जाणून घ्या!

?‍♀️ सध्या गावागावात निवडणुकीचा धुराळा आहे. सरपंच पदी कोणाची निवड होणार हे जाणून घेण्यात त्या त्या गावातील नागरिकांना रस आहे.

? या आहेत सरपंच निवडीच्या अटी

? कायद्यात नवीन तरतुदी झाल्या आणि आता 1995 नंतर जन्माला आलेला सरपंच पदाचा उमेदवार निदान सातवी पास असावा अशी अट आहे.

? निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडून पासबुक झेरॉक्स (राष्ट्रीयकृत बँक) अनामत रक्कम भरल्याची पावती सादर करावी.

? वय 21 वर्षे पूर्ण असल्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र सहा महिन्यात दाखल करण्याचे हमीपत्र द्यावे.

?‍?‍?‍? 12 सप्टेंबर 2001 नंतर अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र, (राखीव उमेदवारांसाठी), मालमत्ता घोषणापत्र सादर करावे.

? शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र, थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.

? गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती देताना आपण ग्रामपंचायतीचे ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, सरपंच पदी निवडून येण्यास अपात्र नसल्याचे प्रमाणपत्र आणि त्यात जे काही इतर मुद्दे असतील त्याचे निरसन यात करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here