सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे – प्रकाश आंबेडकर
मुंबई : राज्यातील काही पोलीस अधिकारी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते, असं गृहमत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. अनिल देशमुख यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.





