सरकारी साक्षीदार विजय मकासरे यांना निलंबित पोलिस अधिकारी तुषार धाकराव यांची दमबाजी.
अहमदनगर: प्रतिनिधी:
विजय मकासरे हे आज दिनांक २२फेब्रू२०२२ रोजी राहुरी येथील मोक्का तील आरोपी पलायन प्रकरणी जबाब देणे कामी पो.अधीक्षक कार्यालय येथे आले असता सदर प्रकरणामुळे निलंबित करण्यात आलेले पी एस आय. तुषार धाकराव यांनी विजय मकासरे यांच्या गळ्यात हात टाकून बाजूला घेत ” माझ्या बाजूने जबाब दे, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेल.”असे म्हणून दमबाजी केली.
सदर च्या झालेल्या घटनेमुळे विजय मकासरे यांच्या जीवितेला धोका निर्माण झालेला आहे. तसेच निलंबन झालेले असूनही निलंबित पोलिसांची मुजोरी अजूनच वाढली आहे.या घटेन नंतर लगेच विजय मकासरे यांनी मा.पो अधिक्षक साहेबांना सदर घटने संदर्भात लेखी तक्रार केली आहे. 
सदर ची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून माननीय पोलिस अधीक्षक साहेब निलंबित पोलिस अधिकारी तुषार धाकराव यांच्या विरुद्ध कारवाईचे आदेश करतील ? या कडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



