
सरकारच्या वतीनं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेनुसार महागाई भत्ता 50 टक्क्यांच्याही पलीकडे पोहोचल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकदोन नव्हे, तब्बल 13 भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ होत आहे. मार्च महिन्यातच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.सरकारनं निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अर्थात डीआर 4 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांवर आणला आहे. ज्यामुळं सरकारी कर्मचाठऱ्यांचं वेतन आणि त्यांच्या निवृत्तीवेचनाच्या आकडेवारीत भर पडली आहे. DA 50% पोहोचल्यामुळं आता इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार असून, यामध्ये हाउस रेंट अलाउंस (HRA)चा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. ?शासनाच्या अध्यादेशानुसार 01-01-2024 पासूनच्या निम्नलिखित भत्त्यांची रक्कम कर्मचाऱ्यांना 25 टक्के वाढीव दरानं देण्यात येऊ शकते असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मिळणारा विशेष भत्ता, पाल्यांना मिळणारा भत्ता, शिक्षण भत्ता, घरभाडं भत्ता, गणवेश भत्ता, ड्यूटी भत्ता, डेप्युटेशन भत्ता, वाहन भत्ता अशा भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.



