मुंबई : आर्यन खान (aryan khan) ड्रग्ज प्रकरणाला (drugs case) आता वेगळं वळण मिळालं असून अनेक धक्कादायक खुलासे
समोर आले आहेत. त्यामुळे एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यानंतर आता मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र पाठवत वानखेडे यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोणी केली मागणी..?
मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र
किरण गोसावी (kiran gosavi) याच्या बॉडीगार्डने (ता. २४ ऑक्टोबर) सकाळी क्रूझ ड्रग्जप्रकरणी शाहरूख खानच्या मॅनेजरकडून ५० लाख रुपये घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना ॲड कनिष्क जयंत यांनी या मागणी संदर्भातील पत्र लिहिले आहे. त्या पत्रात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या सहा जणांवर शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे अपहरण करणे आणि खंडणी मागणे या प्रकरणात फिर्याद नोंदवण्याची मागणी पोलिस आयक्त नगराळे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. एनसाबीचे अधिकारी समीर वानखडेसह ६ जणांवर शाहरूख खानच्या मुलाचे अपहरण करून खोटा गुन्हा दाखल करून अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी तक्रार अँड कनिष्ठ जयंत यांनी माता रमाबाई पोलिस ठाणे, यलोगेट पोलिस ठाणे व स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे समीर वानखडेसह अन्य जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अ) के. पी. गोसावी, मनीष भानुशाली या प्रमुख आरोपीसह ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या विरोधात कॉर्डेलिया क्रुज संदर्भात गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने पूर्णतः खोटे प्रकरण गुन्हेगारी हेतु मनात ठेवून पूर्णत्वास नेण्यासंदर्भात केलेल्या गुन्हेगारी कृत्यांविरोधात एफ.आय.आर. नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार..
ब) के.पी. गोसावी, मनीष भानुशाली यांच्या विरोधात लोकसेवक असल्याची बतावणी करून तोतयागिरी करणे, फक्त लोकसेवकाला असलेल्या अधिकारांचा गुन्हेगारी हेतु मनात ठेवून तसेच बलप्रयोग करून खंडणी उकळण्याचा हेतु मनात ठेवून आर्यन शाहरुख खान याची फसवणूक करून व त्यानंतर त्याचे अपहरण करून प्रचलीत फौजदारी दाखल करण्याची मागणी
किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. आर्यनला एनसीबीने पकडल्यानंतर त्याच रात्री गोसावी व सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले होते. त्यावेळी त्यांच्या पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर सकाळी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा बॉडीगार्ड साईलने आज सकाळी केला होता. त्यानंतर एनसीबीकडे दुपारी पत्रक काढून खुलासा करण्यात आला होता. वानखेडे यांनी कार्डिलिया क्रूझवर छापेमारी करत आर्यनसह काही जणांना अटक केली होती. यावेळी त्यांनी ज्या पंचाच्या सह्या घेतल्या आहेत, त्यामध्ये गोसावीसह प्रभाकरचंही नाव होतं.
मुंबई : आर्यन खान (aryan khan) ड्रग्ज प्रकरणाला (drugs case) आता वेगळं वळण मिळालं असून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यानंतर आता मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र पाठवत वानखेडे यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोणी केली मागणी..?मुंबई पोलिस आयुक्तांना पत्रकिरण गोसावी (kiran gosavi) याच्या बॉडीगार्डने (ता. २४ ऑक्टोबर) सकाळी क्रूझ ड्रग्जप्रकरणी शाहरूख खानच्या मॅनेजरकडून ५० लाख रुपये घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना ॲड कनिष्क जयंत यांनी या मागणी संदर्भातील पत्र लिहिले आहे. त्या पत्रात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या सहा जणांवर शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे अपहरण करणे आणि खंडणी मागणे या प्रकरणात फिर्याद नोंदवण्याची मागणी पोलिस आयक्त नगराळे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. एनसाबीचे अधिकारी समीर वानखडेसह ६ जणांवर शाहरूख खानच्या मुलाचे अपहरण करून खोटा गुन्हा दाखल करून अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी तक्रार अँड कनिष्ठ जयंत यांनी माता रमाबाई पोलिस ठाणे, यलोगेट पोलिस ठाणे व स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे समीर वानखडेसह अन्य जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अ) के. पी. गोसावी, मनीष भानुशाली या प्रमुख आरोपीसह ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या विरोधात कॉर्डेलिया क्रुज संदर्भात गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने पूर्णतः खोटे प्रकरण गुन्हेगारी हेतु मनात ठेवून पूर्णत्वास नेण्यासंदर्भात केलेल्या गुन्हेगारी कृत्यांविरोधात एफ.आय.आर. नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार.. ब) के.पी. गोसावी, मनीष भानुशाली यांच्या विरोधात लोकसेवक असल्याची बतावणी करून तोतयागिरी करणे, फक्त लोकसेवकाला असलेल्या अधिकारांचा गुन्हेगारी हेतु मनात ठेवून तसेच बलप्रयोग करून खंडणी उकळण्याचा हेतु मनात ठेवून आर्यन शाहरुख खान याची फसवणूक करून व त्यानंतर त्याचे अपहरण करून प्रचलीत फौजदारी दाखल करण्याची मागणीकिरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. आर्यनला एनसीबीने पकडल्यानंतर त्याच रात्री गोसावी व सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले होते. त्यावेळी त्यांच्या पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर सकाळी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा खुलासा बॉडीगार्ड साईलने आज सकाळी केला होता. त्यानंतर एनसीबीकडे दुपारी पत्रक काढून खुलासा करण्यात आला होता. वानखेडे यांनी कार्डिलिया क्रूझवर छापेमारी करत आर्यनसह काही जणांना अटक केली होती. यावेळी त्यांनी ज्या पंचाच्या सह्या घेतल्या आहेत, त्यामध्ये गोसावीसह प्रभाकरचंही नाव होतं.



