समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढा सुरूच ठेवणार : नवाब मलिक

467

Nawab Malik on Wankhede : मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.  वानखेडेंच्या मनमानी कारभारावर चाप बसणे गरजेचे होते. कारण, ते काही लोकांसाठी लॉबिंग करत होते. समीर वानखेडे यांची बदली झाली असली तरी लढाई संपलेली नाही. हा लढा चालूच राहणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. जाडपातळणीबाबत चौकशी सुरू आहे. आमच्याकडे जे काही पुरावे ते सादर करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

युपीएससीच्या नोकरीत असताना त्यांनी सद्गुरू बार चा परवाना त्यांनी स्वत:च्या नावाने परवाना काढला होता. त्याबाबतीतसुद्धा कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर दुसरे लग्न केल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीबाबतीत माहिती लपवली आहे. त्याबाबतही आम्ही तक्रार केली होती. तसेच आर्यन खान प्रकरणाचीसुद्धा एसआयटी (SIT) चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी जे काही मुद्दे उपस्थित केले होते, त्याचा पाठपुरावा करणार असून, जिथे जिथे बेकायदेसीर कामे केली आहेत, हे सिद्ध होईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मलिक म्हणाले. 

एखादा व्यक्ती शासकीय नोकरीत असताना मनमानी कारभार करत असेल, चुकीच्या पद्धतीने अधिकाराचा गैरवापर करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी. समीर वानखेडे यांच्यासाठी भाजपचे काही लोक लॉबिंग करत असल्याचा आरोपही यावेळी मलिक यांनी केला. मात्र, लॉबिंग करणारांची नावे आत्ताच सांगणार नसल्याचे यावेळी मलिक यांनी सांगितले.

लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्र सरकार गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची पाठराखण करत असल्याचे मलिक म्हणाले. याप्रकणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. गृहराज्य मंत्र्यांच्या मुलावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. पण पंतप्रधान मोदी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी मलिक यांनी केला आहे. याप्रकरणानंतर मोदींनी मंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी करायला हवी होती असे मलिक म्हणाले. त्याचबरोब सत्यपाल मलिक यांनी मोदींबद्दल केलेले वक्तव्य गंभीर आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी मलिक यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here