समीर वानखेडेंची एसआयटीमार्फत चौकशी? मुख्यमंत्र्यांचे संकेत; मलिक, वळसे पाटील यांच्यात चर्चा

समीर वानखेडेंची एसआयटीमार्फत चौकशी? मुख्यमंत्र्यांचे संकेत; मलिक, वळसे पाटील यांच्यात चर्चा

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आता नवे वळण घेत आहे. या प्रकरणात आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपण केलेले आरोप खोटे असतील, तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी निकराची भाषा त्यांनी वापरली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांना न्यायालयात बदनामीचा दावा दाखल कराच असे आव्हान त्यांनी दिले. एकीकडे शिवसेना मलिक यांच्या टीकेवर नाराज असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.वानखेडे यांची कोंडीवानखेडे यांनी न्यायालयात धाव घेऊन आपल्याविरोधात गुन्हा दाखल होऊ नये, असा प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना अपयश आले. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यांनी पोलिस महासंचालकांकडे अर्ज देऊन कारवाई न करण्याची विनंती केली; परंतु मलिक यांनी घेतलेला पवित्रा पाहता त्यांना तिथेही फार काही हाती लागेल, असे नाही. वानखेडे यांच्याविरोधातील २६ प्रकरणांची यादीच एका अधिकार्‍याने निनावी पत्राने दिल्याने वानखेडे यांची कोंडी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता या प्रकरणाची चौकशी अटळ असल्याचे दिसते.गुन्हा दाखल होणार!ठाकरे आणि वळसे पाटील यांच्यासोबत एनसीबीच्या धाडी आणि ड्रग्ज प्रकरणावर चर्चा झाली. या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, असे मलिक यांनी सांगितले. त्यामुळे वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मलिक यांनी ठाकरे आणि वळसे पाटील यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी एनसीबीचे धाडसत्रं आणि ड्रग्ज प्रकरणावर चर्चा करून त्यांच्यासमोर काही तथ्ये ठेवली. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.…तर सर्व गोष्टी बाहेर येतीलपोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. तपास करून निश्चित रुपाने त्यावर गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल, असे आश्वासन वळसे पाटील यांनी मलिक यांना दिले. एकदा एफआयआर झाल्यानंतर गोसावीसारखे लोक कसे पैसै उकळतात किंवा कसे लोकांना हँडल करतात हे तपासातून बाहेर येईल, याचा मला विश्वास आहे. एकदा एफआयर झाला की सर्व गोष्टी बाहेर येईतील, असे त्यांनी सांगितले.गुन्हा व्यक्तीवर नाही घटनेवरवानखेडे यांच्यावर एफआयआर दाखल होणार का? असा थेट सवाल मलिक यांना करण्यात आला. त्यावर मलिक यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. एफआयआर घटनेबाबत होईल. खंडणी वसूल करणे, पंच फरार असताना आरोपींना हँडल करणे, कोर्‍या कागदावर सह्या घेणे आदी गोष्टींचा तपास होईल आणि त्यानंतर पोलिस फिर्याद दाखल करतील. फिर्याद व्यक्तीविरोधात होणार नाही. घटनेची असेल. तपासात जेजे जबाबदार असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल. कुणाला सूडबुद्धीने अडकवायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एसआयटीचा निर्णय लवकरचपोलिसांकडे आलेल्या तक्रारींवर निर्णय घेऊन एसआयटी नेमावी की आणखी काय करायचे याचा निर्णय क्राईम ब्रँच घेईल, असे आश्वासन मलिक यांना देण्यात आले. हॉलिवूडनंतर बॉलिवूड मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीला बदनाम केले जात आहे. पाच दहा जणांवर गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here