समाजसेवेचा नवा पॅटर्न साईद्वारका सेवा ट्रस्ट

745

राजकारण आणि सार्वजनिक क्षेत्रात काम कराताना एखाद्या नगरसेवकाकडे अथवा राजकीय नेत्याकडे एका ठराविक दृष्टीकोनातूनच पाहिले जाते. मात्र, नगर शहराच्या राजकारणात आजही अनेक युवा कार्यकर्ते, नगरसेवक सामाजिक दृष्टीकोन ठेवून निस्वार्थपणे कार्यरत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ॲड. धनंजय कृष्णाजी जाधव!

ॲड . धनंजय कृष्णाजी जाधव

आजोबा माजी उपनगराध्यक्ष स्व. दत्तात्रय जाधव, आजी माजी नगरसेविका नानीबाई जाधव, वडिल माजी उपनगराध्यक्ष स्व. कृष्णाभाऊ जाधव हे नगर शहराच्या तत्कालीन नगरपालिकेच्या राजकारणातील केंद्रबिंदू, राजकारणाच्या माध्यमातून अनेक मोठ्या पदांवर काम करण्याची संधी स्व. कृष्णाभाऊंना मिळाली. मात्र, सामान्य जनतेशी जुळलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. स्वतःचा वॉर्ड, स्वतःचा प्रभाग याही पलिकडे जाऊन त्यांनी शहराच्या सर्व भागातील सामान्यांना नेहमीच मदतीचा हात दिला . स्व. कृष्णाभाऊंच्या सामाजिक योगदानाचा हाच वारसा घेऊन आता ॲड. धनंजय जाधव यांनी स्वतःचा प्रभागच नव्हे तर संपूर्ण शहरात हेल्प मी इंडिया व साई द्वारका ट्रस्टच्या माध्यमातून आपले समाजकार्य सुरू केले आहे. यांच्या सामाजिक दृष्टीकोनातून अनेक रुग्णांना मोठा आधार मिळाला. प्रभागातील सामान्य नागरिक, विडी कामगारांचे प्रश्न सोडवितांनाच कोरोनाचा काळात ॲड. जाधव यांनी राबविलेला तोफखाना पॅटर्न जिल्ह्यात आदर्श ठरला.

महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडणूक आल्यानंतर ॲड. धनंजय जाधव यांनी प्रभागातील मूलभूत समस्या सोडविण्यावर प्राधान्याने भर दिला. प्रभागातील रस्ते कचऱ्याचा प्रश्न यासह पथदिव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. स्व. कृष्णाभाऊंचा आदर्श डोळ्यासमोर काम करताना ॲड. जाधव यांनी स्वतःच्या प्रभागापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील सामान्यांना मदतीसाठी पुढाकार घेतला. साईद्वारका ट्रस्ट व हेल्प मी इंडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध उपक्रम त्यांनी राबविले कोरोनाकाळात तोफखाना परिसर हॉटस्पॉट झाला. या परिसरातील विडी कामगारांसह हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली. अशात साईद्वारका ट्रस्ट व हेल्प मी इंडिया या सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरली. नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटायझरचे वाटप, होमिओपॅथिक औषधांचे वितरण यासह प्रभागातील नागरिकांच्या अधिकाधिक तपासण्या करून तोफखाना परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी ॲड. जाधव यांनी प्रयत्न केले. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, विडी कामगारांसह प्रभागातील छोट्या व्यावसायिकांची उपासमार होऊ नये, यासाठी नागरिकांना धान्य, किराणा साहित्याचे वाटप केले गेले. लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यासाठी सर्व गणेश मंडळांना एकत्र आणून ‘लकी ड्रॉ पध्दतीने नियोजन केले.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत या उपक्रमाचे कौतुक केले.कोरोना काळात आणि आत्ताही नागरिकांसमोर महागड्या वैद्यकीय सेवा व उपचाराचा खर्च हे सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सामान्य नागरिक उपचाराविना राहू नये, यासाठी ॲड. जाधव यांनी अनेक रुग्णांना साईद्वारका ट्रस्ट व हेल्प मी इंडियाच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधांसह अर्थसाहाय्यही उपलब्ध करुन दिले.

अनेक रुग्णांवर गुंतागुंतीच्या व मोठ्या खर्चाच्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. यावेळीही ॲड. जाधव यांनी स्वतः तर मदत केलीच, शिवाय स्वतः पुढाकार घेऊन या रुग्णांच्या उपचारासाठी मदत गोळा करण्यासाठी प्रयत्न केला. पायाला लकवा आल्यामुळे व उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बिछान्यावर खिळलेला तेजस ॲड. जाधव यांच्या हेल्प मी इंडियामुळे उपचार घेऊन पायी चालत घरी गेला. तसेच केवळ आठ महिन्यांच्या साईवर हृदयाची मोठी शखक्रिया करण्याची वेळ आली. त्यासाठी काही लाखांच्या घरात खर्च असल्याने पळशीकर कुटुंबिय हवालदिल झाले होते. मात्र, ॲड. जाधव यांनी स्वतः पुढाकार घेत मदत उभी केली आणि पळशीकर कुटुंबियांना आधार दिला. तेजस आणि साईसारखी अशी अनेक उदाहरणे या नगर शहरात आहेत. कुठलाही गाजावाजा न करता अनेक वर्षापासून ॲड. धनंजय जाधव यांचे हे निस्वार्थकार्य सुरूच आहे. ॲड. जाधव यांच्यासह सिध्देश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव हेही समाजकार्यात अग्रेसर आहे.

अपंगत्वामुळे समाजापासून दुरावलेल्या अंध-अपंग मुलांनाही मदतीसाठी अँड. जाधव यांनी पुढाकार घेतला. दिव्यांग मुलांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करून, तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून या चिमुकल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ॲड. जाधव यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. नगर शहरासह राज्यभरातील अनेक रुग्णांना साईद्वारका ट्रस्ट व हेल्प मी इंडियामुळे परदेशातूनही मदत मिळाली. प्रभागातील समस्या सोडविण्यापासून ॲड. जाधव यांनी सुरू केलेल्या कार्याला हेल्प मी इंडियाच्या माध्यमातून व्यापक स्वरुप आले. त्यांच्या या कार्याची व सामाजिक सेवेची सातासमुद्रापार दखल घेतली गेली, यातूनच त्यांच्या कार्याची प्रचिती येते..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here