समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी 20 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन

465

समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी 20 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन
जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील अर्ज

नांदेड, (जिमाका) दि. 14:- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 सप्टेंबर 2021 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here