- सभापति पदासाठी कुमारसिंह वाकळे यांचे नाव आघाडीवर ; शिवसेनाही इच्छुक
- स्थायी समितीच्या सभापतीची निवडही लवकरच करावी लागणार आहे. रिक्त जागांवर सदस्य नियुक्ती झाल्यामुळे आता प्रशासनाकडून सभापतिपदाच्या निवड घेण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यानुसार निवडीची तारीख विभागीय आयुक्तांकडून जाहीर होईल. सभापति पदासाठी कुमारसिंह वाकळे यांचे नाव सध्या आघाडीवर असले तरी शिवसेनेलाही हे पद मिळावे, अशी इच्छा आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी असल्याने त्यांच्यात एकमत होऊन सभापतिपदाचे वाटप निश्चित होईल.





