
युथ कराटे फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू सन्मान सोहळा व आदर्श पालक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न !
अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर मधील खेळाडूंनी गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच मागील वर्षांमध्ये राज्यस्तरीय आणि शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा दि. ४ मार्च २०२३ रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. तसेच सर्व खेळाडूंच्या पालकांना आदर्श पालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी अरफा शेख , महेक पठाण , माही शेख , याहया सय्यद , आरफ शेख , अशाज शेख , अब्दुल रेहमान सय्यद , अब्दुल्ला सय्यद , तासिन सय्यद आरफ शेख , सुजित हजारे , अजीम सय्यद , साहिल सय्यद इत्यादी विद्यार्थ्यांना आदर्श खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर शालेय क्रीडा स्पर्धा आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आलिया सय्यद , इब्राहिम शेख , अहमद शेख , अयमन शेख , शादाब शेख , जय्यान शेख , तुबाफातेमा पठाण , अरसलान सय्यद , हुझेफ शेख , आराध्या करांडे, या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
आदर्श पालक पुरस्काराने , प्राध्यापक मुदस्सर सय्यद , मतीनखान पठाण , तौसिफ शेख , तौफिक सय्यद , नियाजअहमद शेख , अर्शद शेख , सईद शेख , अहमदअली सय्यद, आदिल सय्यद , शाकीर सय्यद , या पालकांना आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी आ. संग्राम जगताप , प्रहार जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी , माजी. आरटीओ अधिकारी शाहनिजाम सय्यद , शिहान विजय कोळी , नगरसेवक असिफ सुलतान , नगरसेवक समद खान , नगरसेवक फारुक शेख , माजी नगसेवक शेख मुदस्सर, सामाजिक कार्यकर्ते जुबेर सय्यद , ज्येष्ठ पत्रकार अफजल सय्यद , जहीर सय्यद , आदी मान्यवर उस्थितीत होते.
कार्यक्रमाचे आयोजन युथ कराटे फेडरेशन च्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, युथ कराटे फेडरेशनचे अध्यक्ष साहिल सय्यद , सचिव सबिल सय्यद , प्रशिक्षक सुजित हजारे , प्रशिक्षक अजीम सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना आमदार संग्राम जगताप यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले होते.




