- ‘सन्नाटा’ शांत झाला! किशोर नांदलस्करांचे कोरोनामुळे निधन
- ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी 12.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
- किशोर नांदलस्कर यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातही काम केले होते. मराठीत शेजारी शेजारी, शेम टू शेम, बाळाचे बाप ब्रह्मचारी, वाजवा रे वाजवा या चित्रपटातील भूमिका गाजल्या. तर हिंदीत वास्तव, प्राण जाये पर शान ना जाये तर जिस देस मे गंगा रेहता है या चित्रपटातील सन्नाटाची विनोदी भुमिका विशेष गाजली.





