प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा”.
मुंबई | नागरिकांनो तुम्ही गाफील राहू नका. लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी आणि पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी आज पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
स्थलांतरित कुटुंबांची काळजी घेण्यात यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत पुरवण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.