
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी! वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीवर निर्णय होणार,
बीड: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती आणि संपत्तीच्या जप्तीवरही आज कोर्टात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची ही आठवी सुनावणी असून संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याच्या दोषमुक्ती अर्जावर सुनावणी होणार आहे.
तसेच कराडच्या मालमत्ता चल उचल संपत्ती जप्त करण्यासंदर्भात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सरकारी वकिलांकडनं अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावरती आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे. त्याचबरोबर आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने आठवी सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी उज्वल निकम हे देखील युक्तिवाद करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्ती संदर्भाच्या अर्जावरती आज बीडच्या न्यायालयात कामकाज चालणार आहे. आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.