
बीड : दिवंगत सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावे, आरोपींची मागणी… “ऍड. निकम एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांच्याकडून निःपक्ष कामकाज होणार नाही, म्हणून ऍड. निकम सरकारी वकील नकोत,”
अशी या प्रकरणातील आरोपींची मागणी आहे.यावर सकाळी न्यायालयात सुनावणी झाली. वकील निकम यांनी व्हीसीद्वारे सहभागी होत आपली बाजू मांडली. ” सरकारी वकिलासाठी असा कोणताही नियम नाही. त्यामुळे आपण सरकारी वकील म्हणून काम करू शकतो, ” असे म्हणणे ऍड. निकम यांनी मंडले. कोर्ट यावर दुपारी निर्णय देणार आहे. त्यानंतर दोषारोप निश्चित करण्याचे कामकाज होणार आहे.



