संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक आज बिनविरोध पार पडली ऍड.प्रतापकाका ढाकने यांचा करिष्मा

    174

    {अविनाश देशमुख शेवगांव }
    9960051755

    यां बाबत सविस्तर वृत्त असे की संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांसाठी 49 अर्ज दाखल करण्यात आले होते उर्वरित उमेदवारांनी आपले अर्ज स्वखुशीने आज अखेरच्या दिवशी मागे घेतले त्यामुळे या निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी असून कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सलग चौथ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार.

    संघर्ष होता बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मागील पंधरवड्यापासून सुरू झाली होती आज दिनांक 6 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता 19 संचालक मंडळांसाठी एकूण 49 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते प्रतापराव ढाकणे यांच्या कुशल नेतृत्वाखाली 19 पैकी उर्वरित अर्ज दाखल केलेल्यांनी आज आपले उमेदवारी अर्ज व कृषी ने मागे घेतले बिनविरोध निवडून आलेल्या जागा व मतदार संघ याप्रमाणे सर्वसाधारण उत्पादक मतदारसंघ क्रमांक एक मधून प्रकाश गंगाधर घनवट बाळू फुंदे सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती मतदारसंघ क्रमांक हादगाव गट भाऊसाहेब मुंडे सुरेशचंद्र होळकर अशोक निवृत्ती तानवडे सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती मुंगी गटातून बापूराव भानदास घोडके श्रीमंत रंगनाथ गव्हाणे रणजीत पांडुरंग घुगे चापडगाव गटातून पांडुरंग हरिभाऊ काकडे शिवाजी विश्वनाथ जाधव सदाशिव हरिभाऊ दराडे हसनापुर गटातून ऋषिकेश प्रतापराव ढाकणे माधव भीमसेन काटे उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था या गटातून प्रतापराव बबनराव ढाकणे अनुसूचित जाती जमाती मतदार गटातून सुभाष कचरू खंडागळे महिला प्रतिनिधी गटातून मीना संदीप बोडके सुमन मोहन दहिफळे तर इतर मागास वर्ग मतदारसंघातून तुषार शिवनाथ वैद्य भटक्या विमुक्त व जाती जमाती मतदारसंघातून त्रिंबक दत्तू चेमटे यांची आज कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली या कारखान्याची स्थापना माजी केंद्रीय मंत्री श्री बबनराव ढाकणे यांनी सुमारे 32 वर्षांपूर्वी केली होती स्थापना काळापासून कारखान्याच्या उभारणी दोन निवडणुका झाल्या त्या दोन्ही निवडणुका एक होती जिंकल्या . त्यानंतर मागील 21 वर्षांपासून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चार पंचवार्षिक निवडणुका या आजपर्यंत बिनविरोध पार पडल्या कारखाना स्थापनेमुळे बोधेगाव परिसरातील अनेक गावांना उभारी व ऊर्जेत अवस्था प्राप्त झाली कारखान्याच्या उलाढाळीमुळे येथील व परिसरातील अनेक शेतकऱ्यांना ऊर्जेचा अवस्था निर्माण होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केदरेश्वर सहकारी साखर कारखान्यामुळे शक्य झाले त्यामुळेच आज परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या विश्वासामुळे प्रतापराव ढाकणे यांनी सलग चौथा द्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून दाखवली.

    अविनाश देशमुख शेवगांव
    सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here