श्री.विजय मकासरे यांना मा. उच्च न्यायालयाचा दिलासा औरंगाबाद -: श्री.विजय मकासरे रा. राहुरी तसेच एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन मध्ये देवेंद्र सिताराम लांबे यांने त्यास विजय मकासरे यांनी राहुरी टाकळीमिया रोडवर, हॉटेल नंदिनी जवळ त्याची गाडी आडवून त्यास जीवे मारण्याची धमकी देवुन त्याचे जवळील राख रुपये २५,०००/- व सोन्याची अंगठी जबरदस्तीने विजय मकासरे यांच्या सोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने चोरुन घेतल्या संबंधी गुन्हा दाखल केला होता..वास्तवीक पाहता विजय मकासरे यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी राहुरी येथील प्रसिध्द व्यापारी यांना विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी दुधाळ यांच्या विरोधात पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. तसेच यातील फिर्यादी देवेंद्र लांबे त्याचे विरुद्ध विजय मकासरे यांनी त्यांची सोशल मिडिया वर बदनामी करुन समाजामधील प्रतिष्ठा मलीन करण्याच्या उद्देशाने बातम्या टाकल्या होत्या. त्यासंबंधीतविजय मकासरे यांनी राहुरी पोलिस स्टेशन येथे देवेंद्र लांबे यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता आपल्या विरुध्द पोलिस सायबर गुन्ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करतील या भितीने तसेच विजय मकासरे यांच्याशी असलेल्या पुर्व वैमनस्यातुन व वैयक्तिक दोषापोटी देवेंद्र लांबे यांनी सदरचा गुन्हा राहुरी पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलेला आहे. तसेच विजय मकासरे यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे विरुद्ध मोर्चा काढल्याचा राग दुधाळ यांच्या मनात होता त्यामुळे त्यांनी देवेंद्र लांबे यांचेशी हात मिळवणी करुन विजय मकासरे यांच्या विरोधात संगनमताने खोटा गुन्हा दाखल केला.सदर प्रकरणात श्री. विजय मकासरे यांनी ॲडव्होकेट दत्तात्रय मरकड यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे अटकपूर्व जामीन मिळणेकामी अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जावर प्राथमिक सुनावणी मा. उच्च न्यायालय यांनी विजय मकासरे यांना दिलासा देतांना सदर प्रकरणात पुढील तारखेपर्यंत त्यांना अटक करु नये असा आदेश दिला.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
आता महिलांना मिळणार 5 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट* केंद्र सरकारची नवीन योजना
केंद्र सरकारने आजपासून गावात राहणाऱ्या महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे - याअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय पाच...
डझनभर आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय; सत्ता टिकवण्यासाठी नवी खेळी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे....
‘अदानींचा भाऊ…’: काँग्रेसचे सरकारला तीन प्रश्न; ‘हम अदानी के हैं कौन म्हणू शकत नाही’
पनामा पेपर्स आणि पेंडोरा पेपर्समध्ये त्यांचे भाऊ विनोद अदानी यांचे नाव असताना अदानी समूह कधीच तपास यंत्रणांच्या...