श्री गणेश उत्सव:कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा; शासनाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करा-

559

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

    अकोला,दि. 4(जिमाका)- आगामी काळात श्री गणेश उत्सवाचे सुरुवात होणार आहे. या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थाबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. शासनाने जाहिर केलेला मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

        यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कायदा व सुव्यवस्थसंबंधी बैठकीचे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, पोलीस उपअधिक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार,  मुकेश चव्हाण, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसिलदार, पोलीस निरीक्षक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

        यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, श्री गणेश उत्सवात सर्व यंत्रणानी समन्वय ठेवून कार्य करावे, गणपती मंडळानी आवश्यक त्या परवानगी घेतल्याचे खात्री करावी. परवानगी देताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे काटकोरपणे पालन करावे. गणेश स्थापनाच्या दिवशी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. याकरीता स्थानिकस्तरावर नियोजन करावे. गणेशोत्सव साजरा करत असताना कोरोनाचे संकट कायम असल्याची जाणीव कायम ठेवा. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक ते उपाययोजना राबवा.  तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. कामात दिरंगाई व कामचुकारपणा  करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here