श्रीरामपूर, शिर्डी परिसरात घराचा दरवाजा तोडून दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार जेरबंद,

508

श्रीरामपूर, शिर्डी परिसरात घराचा दरवाजा तोडून दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी कि, दिनांक ०४/०८/२०२१ रोजीचे रात्री फिर्यादी श्री. अशिष अनिल गोंदकर, वय २३ वर्ष, रा. हरिओम बंगला, सितानगर नाला रोड, शिर्डी हे त्यांचे आई व आजीसह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी ७ ते ८ इसमांनी फिर्यादी यांचे बंगल्याचे मेन गेट व दरवाजा कटावनीचे सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी. फिर्यादीची आई व आजी यांना कटावनी व चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचे हातपाय बांधून घरातील सोने चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण १२,२०,०००/ रु. किं. चा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत शिर्डी पो.स्टे. येथे गुरनं. २६९/२०२१ भादवि कलम ४५७, ४५८, ३८०, ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, शिर्डी विभाग, श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षक करुन आरोपी बाबत माहिती घेतली. त्यांनतर मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे सुचना प्रमाणे सदर गुन्ह्याचे तपासकामी पोनि / अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून सुचना दिल्या होत्या. त्या सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना अशा प्रकारचे गुन्हे करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना दाखविण्यात आले होते. त्यावरुन फिर्यादी व साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीचे आधारे गुन्ह्यातील आरोपींचा तपास चालू असताना पोनि/ अनिल कटके यांना गुप्त खबन्याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा अनिल भोसले व त्याचा भाऊ गुलब्या भोसले, दोघे रा. गोंडेगाव, ता. नेवासा व त्याचे टोळीतील साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि /सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोहेकों/सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले, पोकों/ प्रकाश वाघ, मयूर गायकवाड, सागर ससाणे, जालिंदर माने, रोहित येमूल, चालक पोहेकॉ/ उमाकांत गावडे असे आरोपीचा शोध घेत होते. परंतु आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्यामूळे वारंवार आपले वास्तव्याचे ठिकाणे बदलून रहात होते. परंतू पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपीचे मागावर होते. त्या दरम्यान आरोपी अनिल भोसले व त्याचा भाऊ गुलब्या भोसले हे दोघे त्यांचे घरी आले असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गोंडेगाव येथे जावून आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते पळून जावू लागले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन दोन आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते १) यासीनखाँ उर्फ अनिल शिवाजी भोसले, रा. गोंडेगाव, ता. नेवासा, २) सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले, रा. गोंडेगाव, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्यांचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांनी व त्यांचे इतर सहा साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यापैकी एक साथीदार हा विधीसंघर्षीत बालक असुन इतर फरार आरोपींचा शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाही.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेवून आणखी कोठे-कोठे गुन्हे केलेले आहेत याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुक्यामध्ये गुन्हे केल्याची माहिती दिल्याने त्याबाबत पो.स्टे. चे अभिलेखाची पाहणी केली असता सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी.. विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here