
नगर ः श्रीरामपूरमधील (Shrirampur) महिलेवर अत्याचार करून तिला लग्नाचे आमिष दाखविणाऱ्या आरोपीविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपी अरबाज एजाज बागवान (वय 23, रा. संजयनगर, श्रीरामपूर) याला अटक केली आहे.
अरबाजने पीडित महिलेचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्या बरोबर वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. तिला अरबाजकडून एक मुलगाही झाला आहे तसेच ती आता पुन्हा गरोदर आहे. अरबाजकडून तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखविले जात होते. मात्र, त्याने श्रीरामपूरमधील एका महिलेची लग्न केल्याचे पीडित महिलेला कळाल्याने तिने अरबाज विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तात्काळ अरबाजला श्रीरामपूर शहरातून जेरबंद केले. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी पाच गुन्हे दाखल आहेत.