श्रीरामपूर गैंगवार प्रकरण; परस्पर विरोधी आरोपी दोन अटकेत….

    84

    श्रीरामपूर – याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून जेधे-बेग विरुद्ध रुषी जाधव-कपोते-ससाणे ह्या दोन गैंगमध्ये प्रचंड भडका उडाला असून दोन्ही गैंगमध्ये ०८-१० वेळेस परस्परांविरुद्ध शहरातील विविध ठिकाणी हाणमार, कोयत्याने, तलवारीने वार, गोळीबार च्या घटना घडल्या आहेत. तसेच इन्स्टाग्राम ह्या सोशल मीडियावर देखील या दोन टोळ्यांमध्ये वार-पलटवार चालू आहे. एकमेकांचे नाव घेवुन व्हिडिओ पोस्ट व फोटो बनवले जात आहे.

    दरम्यान शहरातील एका घटनेतील दाखल गुन्हा ज्यात जुन्या घास गल्लीमध्ये जेधे व जाधव-कपोते या दोन टोळ्यांमध्ये शस्त्रांसह हाणामाऱ्या झाल्या होत्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भादंवि ३०७ व अन्य कलमांन्वये परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल होता झाला होता. यातील पाहिजे आरोपी गोरख जेधे याला काल दि.३० ऑगस्ट शनिवार रोजी पोलिसांनी अटक केली. गुन्हा घडल्यापासून गोरख जेधे हा फरार होता. तो पोलिसांना मिळून येत नव्हता. काल पोलिसांनी गोरख जेधे आणि ऋषिकेश कांबळे या दोघांना अटक केली.

    तसेच शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गिरमे चौकातील ग्रॅज्युएट चहाच्या दुकानासमोर झालेल्या गावठी कट्ट्याच्या थरारानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी अॅक्शन मोडवर येत तपासाची चक्रे गतीने फिरवून गोळीबार प्रकरणातील आरोपी हुजेफा अनिस शेख, रा. श्रीरामपूर शहर याला कालच पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगार हुजेफा हा देखील शहरातील एका नवीन टोळीचा सदस्य असल्याची माहिती मिळत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here