
श्रीगोंदा – याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजचा लिंगपिसाट शिक्षक नवले याने कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका १८ वर्ष वयाच्या विद्यार्थिनीवर कॉलेजच्या बाथरूममध्ये, प्रयोग शाळेत, तसेच श्रीगोंदा येथील हॉटेलात नेवून बळजबरीने बलात्कार करून शरीर संबंध केले. श्रीगोंद पोलीस स्टेशनचे पोनि शिन्दे यांच्या मार्गदर्शना खालीलिंग पिसाट शिक्षक नवले याला सपोनि आहिरे यांनी तातडीने अटक केली आहे.पीडीत विद्यार्थीनी कॉलेजच्या होस्टेलला रहाते. दुसरा शिक्षक थोरात याच्या मार्फत गणिताचा शिक्षक आरोपी नवले याने पिडीत तरुणीशी जवळीक साधून तुला आय एम पी नोटस् देतो ! परिक्षेत मदत करतो असे सांगून बळजबरीने जानेवारी २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ दरम्यान वेळो वेळी बलात्कार केला. पीडीता एकतर दुसऱ्या जिल्हयातून श्रीगोंदात शिकायला त्यात होस्टेलवर रहाते. त्याच कॉलेजच्याच शिक्षकाने बलात्कार केलाचा प्रकार घडल्याने पिडीत तरुणी प्रचंड दहशती खाली असून तिला आरोपी शिक्षक नवले याने कोणाला काही सांगितले तर तुला, तुझ्या आईवडीलांना मारून टाकीन अशी धमकी दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी नवले रा. भानगांव ता. श्रीगोंदा याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२) (एफ) (एम) ७४, ३५२,३ ५१ (२) बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम ४, ५, (एफ) ५ (एल) ६,८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने विद्यार्थीनी व पालक वर्गात एकच खळबळ उडाली असून मदत करणारा शिक्षक तसेच हॉटेलवाले यांचीही कसून चौकशी सपोनि आहिरे हे करीत आहेत. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात गुंतवणुकीच्या नावाखाली ५०० कोटींची फसवणूक नंतर कापूस व्यापाऱ्याला अपहरण, खंडणी व आता शिक्षकाचाच विद्यार्थिनीवर बलात्कार या घटनांनी श्रीगोंदा तालुका हादरला आहे .





