शेवगाव शहराच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करण्याचा शहर राष्ट्रवादीला अधिकार नाही~ माजी सरपंच सतीश पाटील लांडे

    131

    !!!जाहीर निवेदन!!!
    शेवगाव शहराच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करण्याचा शहर राष्ट्रवादीला अधिकार नाही~ माजी सरपंच सतीश पाटील लांडे

    ता. 08 डिसेंबर 2023 जाहीर निवेदन सध्या शेवगाव शहरांमध्ये शहराच्या रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजना आणि जुन्या योजने मधून शेवगावकरांना दर पंधरा दिवसाला मिळणारे पाणी यावर विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत यामध्ये दोन दिवसांपूर्वी शेवगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माननीय तहसीलदार प्रशांत सांगळे यांना निवेदन देऊन रखडलेल्या पाणी योजनेचा पाठपुरावा करून स्वतःचेच हास्य करून घेतले आहे शेवगाव शहरातील ग्रामपंचायत काळामध्ये व नगरपरिषद झाल्यानंतर वर्षानुवर्षे काही ठराविक लोकांची सत्ता राहिली आहे तसेच नवीन नगरपरिषद झाल्यानंतर पहिले अडीच वर्षे सत्ता राष्ट्रवादीची त्या अडीच वर्षात साधा प्रस्ताव पण पाठवण्याच धाडस केलं नाही त्यांनी कायम पाणी प्रश्न न सोडवता भिजत घोंगडे ठेवले आहे शेवगाव पाणी योजना ही जिल्हापरिषद मार्फत पचायत समिती चालवते या दोन्ही ठिकाणी कायम सत्ता राष्ट्रवादी कडे असून त्याठिकाणी शेवगाव शहराने सभापती उप सभापती पद भोगलेले असून शेवगाव शहराला वेठीस कोण धरत यामुळे शेवगाव शहरवासीयांना हिवाळ्यामध्ये पंधरा दिवसाला पाणी मिळत आहे याला जबाबदार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पद भोगलेले लोक असून तेच निवेदन देऊन शासनाची दिशाभूल करत आहेत शेवगाव शहरातील सर्व जनतेला माहिती आहे पाणी प्रश्न गंभीर करण्यामध्ये कोण कोण सामील आहे जाणून-बुजून सुरू असलेली योजना नादुरुस्त ठेवणे वितरण व्यवस्थेमध्ये ताळमेळ न ठेवणे अधिकाऱ्यांना जाब न विचारणे अशा सगळ्या गोष्टी झाल्यामुळे पाणी प्रश्न कायम चर्चेत राहिला आहे त्यातच ज्यांनी वर्षानुवर्षी सत्ता भोगली शहरातील अतिक्रमण पाणी प्रश्न अंतर्गत रस्ते यावर कायम मौन धारण केले तेच लोक आज शहरवासीयांवर पुतना मावशीचे प्रेम दाखवत असून निवेदन आणि आंदोलनाचा कांगावा करत आहेत यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
    सद्यातर शेवगाव मधील चरचे चा मुद्दा महिलाचां हंडा मोर्चा शोले स्टाईल, महिलांचं नियोजन, महिला एकजुटीचे दर्शन, त्यातही गरज नसताना काही पुरुष मंडळींची लुडबुड फक्त श्रेयवाद

    आपला नम्र —-

    श्री. सतीश माधवराव लांडे
    माजी सरपंच शेवगाव

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here