
याबाबत सविस्तर वृत्त असे कीकाल रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान नवीन तहसील कार्यालय शेवगाव पाथर्डी रोड येथे कार्यालयाच्या आवारामध्ये मोकाट कुत्र्यांच्या कळपाने एका गाईच्या वासरास लचके तोडून मारून टाकले याबाबत परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते जलील राजे व रईस राजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वासरू वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही या काळात त्यांनी गोरक्षक पशुवैद्यकीय अधिकारी पत्रकार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला दरम्यान सदर वासरू तहसील कार्यालयाच्या बंद असलेल्या मुख्य दरवाजाला धडक घेऊन गतप्राण झाले नंतर सारा गाव गोळा झाला परंतु वेळ निघून गेली होती कदाचित तो मुख्य दरवाजा उघडा असता तर वासराचे प्राण वाचले असते शेवगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे नगरपरिषद फक्त कागदी घोडे नाचवून कुत्रे निर्बीजीकरण करण्याची निविदा काढून फार्स केला परंतु शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयश आले नाही मागे अनेक पिसाळलेल्या कुत्र्यांनी अबाल वृद्धांना चावा घेतला आहे आणि जीव घेणे हल्ले केले आहेत याचा बंदोबस्त नगर परिषदेच्या आरोग्य विभाग करणार का??? पशुवैद्यकीय अधिकारी महेंद्र लाड यांनी तात्काळ
दाखल घेऊन दोन कर्मचारी घटनास्थळी पाठवले गोरक्षक सचिन पन्हाळे आणि त्यांचे सहकारी यांनी सदर वासराच्या अंत्यविधीची व्यवस्था स्वखर्चाने केली यावेळी नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ताजा कलम
आज गाईचं वासरू मारून टाकलं उद्या जर या मोकाट कुत्र्यांनी एखादे लहान मुल मारून टाकलं तर??? नगरपरिषद प्रशासनाला केव्हा जाग येणार अनेक सामाजिक संघटनांनी याबाबत वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत परंतु त्याची गंभीर दखल प्रशासन घेत नाही तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला सुरक्षारक्षक आहेत की नाहीत असतील तर ते नेमके कुठे असतात मागे एकदा जत केलेला ट्रॅक्टर चे स्पेअर पार्ट चोरीला गेले होते आणि जप्त केलेली वाळू सुद्धा राजरोस उचलून नेली होती त्यामुळे तहसील कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे.
उल्लेखनीय बाब
मृत वासराचा अंत्यविधी सामाजिक कार्यकर्ते जलील राजे रईस राजे सुनील उर्फ बंडूशेठ रासने यांनी विधिवत स्वखर्चाने जे.सी.बी. बोलावून केला उपस्थितांनी कुचकामी व्यवस्थेचा बळी ठरलेल्या वासराच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली




