शेवगाव-पाथर्डीचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. राजळे यांची थेट दिल्लीवारी

506

शेवगाव-पाथर्डीचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. राजळे यांची थेट दिल्लीवारी

!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्र्यांची घेतली भेट
शेवगाव-पाथर्डीचे प्रश्न सोडविण्यासाठी
आ. राजळे यांची थेट दिल्लीवारी !
पाथर्डी-शेवगाव विधानसभा (Pathardi-Shevgaon Assembly) मतदार संघाच्या आ. मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी शुक्रवारी दिल्लीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. आ. राजळे ह्या सध्या दिल्ली दौर्‍यावर (tour of Delhi) असून तीन दिवसांच्या दिल्ली दौर्‍यात त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील विकास कामांसाठी निधीची मागणी (Demand for funds for development works in Shevgaon-Pathardi constituency) करून मतदारसंघात केंद्र शासनाच्या विविध योजना राबविणे बाबत चर्चा केली.

आ. राजळे या जिंतुरच्या आ. मेघना बोर्डीकर (Jintur MLA Meghna Bordikar) व 0नाशिकच्या आ. सिमा हिरे (Nashik MLA Seema Hire) यांच्यासह दिल्ली दौर्‍यावर असून या दौर्‍यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Union Roads and Highways Minister Nitin Gadkari), रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister of State for Railways, Coal and Mines Raosaheb Danve), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Minister for Micro, Small and Medium Enterprises Narayan Rane), पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील (Minister of State for Panchayat Raj Kapil Patil), महिला व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister of State for Women and Family Welfare Dr. Bharti Pawar), अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad) आदी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या.

यावेळी नवनियुक्त मंत्र्यांचे अभिनंदन करून मतदार संघातील गावांचा विविध योजनेमध्ये समावेश करण्याबाबत सबंधित खात्याच्या मंत्र्यांना निवेदन देऊन आग्रही मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने मतदारसंघातील राज्यमार्ग, महामार्ग व केंद्रीय रस्ते अनुदानातून विविध रस्त्यांची सुधारणा व नवीन रस्त्याची मागणी केली. मतदार संघातील महत्त्वाच्या गावांमध्ये राष्ट्रीय आरोग्य योजना (National Health Plan) व प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center), ट्रॉमा सेंटरची मागणी (Demand for Trauma Center) तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyamaprasad Mukherjee), रूरबन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गावांमध्ये मूलभूत सुविधा व विकासकामांसाठी निधीची मागणी करण्यात आली तसेच मतदार संघातील ग्रामपंचायत कार्यालय नसलेल्या ग्रामपंचायतींना सुसज्ज इमारती ची मागणी केली.

आ. राजळे यांचा तीन दिवसाचा दिल्ली दौरा अत्यंत यशस्वी झाला असून गेल्या दोन वर्षापासुन राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government in the state) आ.राजळे यांना विरोधी पक्षाचे आमदार म्हणुन पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील विकास कामांना निधी देतांना टाळाटाळ करत असल्याने त्यावर मात करत दिल्ली दौरा करून केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातुन मतदारसंघाच्या विकास कामासाठी मोठा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याने आ. राजळे यांच्या दिल्ली दौर्‍याबद्दल पाथर्डी शेवगाव तालुक्यातील जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

पंतप्रधान मोदींनी केले मराठीत स्वागत ..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत आ. मोनिका राजळे यांची ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान कार्यालयात प्रवेश करताच मोदी त्यांनी या.. या असे मराठीतून म्हणत सुहास्य वदनाने आ. राजळे यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महिला सक्षमीकरण, मतदार संघातील पक्ष संघटनेचे बळकटीकरण या विषयावर मोकळ्या मनाने सविस्तर चर्चा केली. तसेच केंद्रीय मंत्री राणे यांनी मतदार संघाच्या विविध प्रश्नांची सखोल माहिती घेऊन माजी आमदार स्व.राजीव राजळे यांची आठवण काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here