शेवगाव चे वादग्रस्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तडकाफडकी बदली शेवगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. दिगंबर भदाणे यांची नियुक्ती
अविनाश देशमुख शेवगांव
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरात झालेली हिंदू मुस्लिम दंगल दंगलीचा सुदोष तपास एकतर्फी कारवाई काही ठराविक लोकांची ऐकून दोन्ही बाजू ऐकून न घेता गुन्हे दाखल करणे असे आरोप कायम त्यांच्यावर झाले होते अनेक वादग्रस्त घटना राजकीय कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे ज्यांच्या बदलीसाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते असे शेवगावचे वादग्रस्त पी. आय. विलास पुजारी त्यांच्या बदलीसाठी अनेक आंदोलने वरिष्ठांकडे तक्रारी झाल्या होत्या मध्यंतरी त्यांची बदली रद्द झाल्यावर शेवगाव शहरांमध्ये तुफान आतिषबाजी झाली होती विलास पुजारी यांची काल 1 डिसेंबर 2023 रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांच्या जागी नाशिक जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले श्री दिगंबर भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली शेवगाव शहरातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी नवनियुक्त पी.आय. दिगंबर भदाणे शेवगाव यांचे हारतुरे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी शेव भाजी माजी सरपंच सतीश पाटील लांडे हमाल मापाडी चे अध्यक्ष एजाज भाई काजी माजी सरपंच राहुल मगरे माजी उपनगराध्यक्ष वजीर भाई पठाण कॉ. संजय नांगरे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अविनाश देशमुख मार्केट कमिटीचे संचालक झाकीर कुरेशी व्यापारी फय्याज सौदागर माजी नगरसेवक कैलास तिजोरे लोकमतचे पत्रकार अनिल साठे आदी मान्यवर उपस्थित होते