शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या शिडीला गळफास घेऊन केली आत्महत्या

1124

अहमदनगर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्तावाढ, आणि घरभाडे भत्तावाढ आदी मागण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्यशासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे झालेले असतानाच आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य असल्याचे समजतेय.त्यांचे वय 56 असून त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अधिक माहिती समजली नसुन परंतु या घटनेमुळे शेवगाव आगारात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.महाराष्ट्रातील विविध एसटी महामंडळाच्या संघटनेची मुख्य मागणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी आहे, ही मागणी सध्या मान्य करण्यात आलेली नाही. मात्र महागाई भत्यात 28 %वाढ, घरभाडे भत्ता यामध्ये शासनाने वाढ केली असून यामुळे राज्य सरकारवर आता यापूढे अतिरिक्त भार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here